'त्या' बंटी-बबलीला अभय कोणाचे?
चोरावर 'मोर' होणाऱ्या 'किरणां'चा बंदोबस्त होणार का?
सांगली : खरा पंचनामा
बिटक्वाइन आणि जागेच्या व्यवहारात फसवणूक करणाऱ्या पूर्व भागातील ऐतिहासिक शहरातील बंटी-बबलीवर काहीजण जरा जास्तच मेहरबान असल्याची चर्चा आहे. चोरावर 'मोर' होण्याचा प्रयत्न मुख्यालयातील काहीजण करत असल्याचेही बोलले जात आहे. या बंटी-बबलीला लगतच्या राज्यात आश्रय घेण्यासाठी 'मोरा'सह आशेचा 'किरण' मिळाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आल्यावर चिरीमिरी घेऊन या बंटी-बबलीला अभय कोण देत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय त्यांना पळून जाण्याचा 'किरण' दाखवणाऱ्या 'मोरा'चा बंदोबस्त होणार का? अशी चर्चा खात्यात आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागातील एका ऐतिहासिक शहरातील बंटी-बबलीने अनेकांना गंडा घातला आहे. बिटक्वाइनच्या माध्यमातून या बंटी-बबलीने अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. हॉटेलसह अन्य मालमत्ता गहाण ठेवून उसने पैसे घेतलेल्यांवर बबलीने गुन्हेही दाखल केले आहेत. त्याशिवाय मालमत्ता विक्री करण्याचा करार करूनही काहींना लाखोंचा गंडा या बंटी-बबलीने घातला आहे. या दोघांचाही अंतरिम जामीन नामंजूर केल्यानंतर दोघेही जिल्ह्यातून गायब झाले आहेत. मात्र त्यांचा जिल्ह्यात काही ठिकाणी वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
भामटे बंटी-बबली गुप्तपणे खात्यातील काहींना भेटत असल्याची चर्चा आहे. त्यात चोरावर 'मोर' होणाऱ्याने दाखवलेल्या 'किरणा'नुसार हे दोघेही लगतच्या राज्यात सुरक्षित असल्याचीही चर्चा आहे. ठराविक दिवसांनी जिल्ह्यात येऊन 'किरण' दाखवणाऱ्या 'मोरा'सह पूर्व भागातील ऐतिहासिक शहरातील काहींना चिरीमिरी देऊन कायदेशीर मार्गदर्शन घेत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या बंटी-बबलीला अभय देणाऱ्या, पळून जाण्याचा किरण दाखवणाऱ्या चोरावर मोराचा बंदोबस्त होणार का असा प्रश्न फसवणूक झालेल्यांकडून उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.