कोल्हापूर परिक्षेत्राला उपविजेतेपद; डॉग स्कॉड, फोटोग्राफीत अव्वल
पुणे : खरा पंचनामा
पुणे येथे पार पडलेल्या राज्य पोलिस कर्तव्य मेळावा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. डॉग स्कॉड, कॉम्प्युटर अवेअरनेस, फोटोग्राफी अवेअरनेसमध्ये संघाने विशेष कामगिरी बजावली. संघाला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पारितोषिक स्वीकारण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनीही उपस्थिती लावत संघाला प्रोत्साहन दिले.
पोलिसांच्या दररोजच्या तपास कामांमध्ये अधिक सुसूत्रता, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी भक्कम पुरावे जमविणे, घटनास्थळाची छायाचित्रे, डॉग स्कॉडची मदत, घातपातविरोधी तपासणीसारख्या कामांबाबत स्पर्धेतून जागरुकता आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला.
पुण्यातील राज्य राखीव पोलिस गट, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथे आयोजन केले होते. मुंबई फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, नागपूर शहर, कोल्हापूर विभाग यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
फिंगर प्रिंट प्रकारात सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम (सांगली) यांनी रजत पदक, कॉम्युटर अवेअरनेसमध्ये प्रसाद मांढरे (सोलापूर ग्रामीण) रजत पदक, पोलिस फोटोग्राफीमध्ये रघुनाथ शिंदे (पुणे ग्रामीण)-रजत पदक, जयवंत सादूल (सोलापूर ग्रामीण)- कांस्यपदक, डॉग स्कॉड ट्रेनिंग सिद्धलिंग स्वामी (सोलापूर ग्रामीण, डॉग-टेरी)- सुवर्ण, नीलेश दयाळ (सातारा, डॉग - सूर्या)-रजत पदक, क्राईम ट्रेकिंग डॉग प्रकारात शिवा सौदागरे (सोलापूर ग्रामीण, डॉग- जिमी) - सुवर्ण पदक मिळवले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.