उद्धव ठाकरे थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; पडद्यामागे मोठ्या घडामोडी
नागपूर : खरा पंचनामा
मागच्या पाच वर्षांपासून एकमेकांना पाण्यात बघणारे दोन नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये गेले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ही सदिच्छा भेट असली तरी भेटीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असं बोललं जातंय.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल सात मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि काही आमदारांची उपस्थिती होती.
या भेटीमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी गेले होते. विधानसभा अध्यक्षांची भेट ही विरोधी पक्षनेत्यासाठी होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.