Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल'

'कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल'



बारामती : खरा पंचनामा

लोकसभेला मोठा फटका बसला होता. कार्यकर्ता खचला होता. महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. पण दुपारपर्यंतचं निकाल लक्षात आला. जून चा अर्थसंकल्प सादर करत असताना काही योजना तयार केल्या.

लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय झाली. 7.5 एचपीपर्यंत विज बिले माफ केली. विरोधकांनी टीका केली पण आम्ही करुन दाखव्याचे अजित पवार म्हणाले. लागलेला निकाल महाविकास आघाडीला पचला नाही. ईव्हीएमबाबत टीका टीपणी करण्यास सुरवात केली. आंदोलने करण्यास सुरवात केली. त्यांच्या कार्यकर्त्यांना बर वाटावं यासाठी त्यांनी हे केल्याची टीका त्यांनी केली.

बारामतीकरांना 14 तारखेलाचं भेटून आभार मानायचे मी ठरवले होते. आता माझी जबाबदारी वाढली आहे. बारामती विधानसभेला अनेकांच लक्ष लागले होते पण कार्यकर्ता कामाला लागला होता, वेगवेगळे आरोप झाले टीका झाल्या. पण आम्ही मतदारांना आवाहन करत होतो. काँग्रेस एकसंघ असताना विरोधक कमकुवत असताना जे मतदान झाल नसताना ते मतदान 2024 ला चाँद्यापासून बांध्यापर्यंत जनतेने केले. बारामतीकरांनी मोठी जबाबदारी टाकली. लोकसभेच्या निकालानंतर ही निवडणूक आली होती. मोजणी दिवशी पोस्टल मोजणीत अजित पवार पिछाडीवर असं काही वाहिन्यांनी चालवलं. आई तर देवघरामसोरचं बसली पांडुरंगा पांडुरंगा म्हणत. ती म्हणाली असं कसं झालं पण बारामतीकरांनी करिश्मा करुन दाखवल्याचे ते म्हणाले.

गुन्हेगारी वाढली आहे. मी पोलिसांना सांगितले आहे कोणीही असले तरी सोडू नका. सरपंचाचा खून झाला. माणूसकीला काळींबा फासणारी घटना घडली. वरीष्ठ पोलिस अधिका- याकडून चौकशी केली जाईल. कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल पण देशमुख यांच्या खूनाचा मास्टरमाईंड शोधणार. सिव्हिल सर्जन म्हणाला आयुष्यात अशी केस बघितली नाही. कोणीही असू द्या सोडणार नाही. आम्हाला शर्मेनी मान खाली घालावी लागते. या शहाण्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडायच नाही असं आम्ही ठरवल्याचे अजित पवार म्हणाले.

परभणी मध्ये ही दोन घटना घडल्या. गेलेली व्यक्ती परत येणार नाही पण त्यांच स्वप्न पूर्ण करण्याचं आश्चासन आम्ही दिलं आहे. बारामतीत देखील काही घटना घडत आहेत. सोशल मिडियाचा होणारा वापर चिंताजनक आहे. पालकांनी मुलामुलिंकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनी मुलांसोबत संवाद ठेवायला शिका. महिलांनी शक्ती अँप ला सहकार्य करा.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.