पोलीस दलात हजारो पदे रिक्त, महिला पोलिसांच्या पदांचाही समावेश
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २१ हजार २५९ मंजूर पदांपैकी ३३ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यात महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असायला हवेत. मात्र, भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी १५२ पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही ७० ने कमी आहेत. देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत. येथे मंजूर संख्येपेक्षा जवळपास ४१ टक्के पोलीस कर्मचारी कमी आहेत. त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते. तेलगंणात २८ टक्के तर महाराष्ट्रात जवळपास १६.३ टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. उत्तराखंडमध्ये सर्वात कमी रिक्त पदे असून ९४ टक्के पोलीस कार्यरत आहेत. अनेकदा पोलीस कर्मचारी तपास सोडून अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात आणि बंदोबस्तांमध्ये गुंतून असतात. त्यामुळे राज्यातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात महिलांचा टक्का ३३ टक्के असावा, यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करीत आहे. परंतु, सद्यस्थितीत राज्य पोलीस दलात महिला पोलिसांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत १६ टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.