Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही..."

"एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही..."



ठाणे : खरा पंचनामा

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य सुत्रधारांना, हत्या प्रकरणातील मास्टरमाईडला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे बीडमधील जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी आज बीडचे नवे एसपी नवनीत कॉवत यांची भेट घेऊन तपासासंदर्भात आढावा घेतला.

त्यातच, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून नाना पटोले यांनीही मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असे म्हटले आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी मराठा नेत्यांना, मंत्र्यांना उद्देशून लक्ष्य केलं. महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी सर्वात पहिली मी केली आहे. कोणतीही चौकशी केली त्याला काही अर्थ नाही. सर्व गोष्टी त्यांना अवगत होतील आणि ताकदीनिशी बाहेर पडतील. त्यामुळे देशमुख यांना न्याय द्यायचा आहे. मला आश्चर्य वाटते की, मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत. एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही की, धनंजय मुंडे यांचे राजीनामा घ्या असे म्हणत राज्य सरकारमधील मराठा मंत्र्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केलं.

समाजापेक्षा मंत्रिपद महत्वाचे आहे का? असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे. महायुती सरकारमध्ये बीड जिल्ह्याला, मुंडे कुटुंबीयांना दोन मंत्रिपदे मिळाले असून येथील सरपंच हत्याप्रकरणावरुन आता वातावरण चांगलच तापलं आहे. त्यामुळे, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे. त्यातच, जितेंद्र आव्हाड यांनीही मंत्रिमंडळातील मराठा नेत्यांना उद्देशून भाष्य केलं. मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत. एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही की, धनंजय मुंडे यांचे राजीनामा घ्या असे म्हणत राज्य सरकारमधील मराठा मंत्र्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केलं. तर, दुसरीकडे आमदार नरेंद्र पाटील यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची अप्रत्यक्षपणे मागणी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.