कोल्हापुरात २९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, सांगलीतील दोघांना अटक
१.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त, शाहुपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर शहरातील मार्केट यार्डजवळ एमडी ड्रग्ज घेऊन फिरणाऱ्या सांगलीतील दोन तरूणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १.१५ लाखांचे २९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती शाहुपुरीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
अथर्व संजय सरवदे (वय २४, रा. रतननगर रोड, विश्रामबाग, सांगली), संतोष काशिनाथ पुकळे (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील मार्केट यार्डजवळ एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती निरीक्षक डोके यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला होता.
तेथील वाळू अड्डा येथे माहिती मिळालेल्या वर्णनानुसार एक तरूण एकासोबत येत असल्याचे पथकाला दिसून आले. पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. त्या दोघांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या पॅंटच्या खिशात एमडी ड्रग्ज सापडले. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, शाहुपुरीचे वरीष्ठ निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक अभिजित पवार, संदीप जाधव, बाबा ढाकणे, रवि आंबेकर, सनिराज पाटील, कृष्णात पाटील, मिलिंद बांगर, महेश पाटील, इंद्रजित भोसले, मंजर लाटकर, उत्तम पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.