संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरण, हैदराबादमधून सुपरस्टार अल्लु अर्जुनला अटक
हैदराबाद : खरा पंचनामा
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लु अर्जुनला अटक करण्यात आली आहे. 'पुष्पा 2' सिनेमाच्या प्रीमिअर शो वेळेस हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली.
याच प्रकरणी अल्लु अर्जुनविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लु अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. संबंधित एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी अल्लु अर्जुनने बुधवारी (11 डिसेंबर) तेलंगणा उच्च न्यायालयात धावही घेतली होती.
सुपरस्टार अल्लु अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी 4 डिसेंबर रोजी रात्री संध्या थिएटरमध्ये मोठी गर्दी झाली होती. पण यावेळेस चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या घटनेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षीय मुलगा जखमी झाला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यामध्ये 5 डिसेंबरला अल्लु अर्जुन, त्याच्या सुरक्षा टीमसह थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस तपासादरम्यान थिएटरच्या मालकांपैकी एकाला, वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरमधील खालील बाल्कनीच्या प्रभारी व्यक्तीला अटक केली. दरम्यान अल्लु अर्जुनने महिलेच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणाही केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.