'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर.. '
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात सत्तास्थापनेपूर्वी घडामोडींना वेग आलाय. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या रक्तपेशी कमीअधिक होत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुगणालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांना थ्रोट इन्फेक्शन झालं आहे ज्या तपासण्या घरी करता येत नाही त्यामुळे ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नये. जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिरस्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ. असं शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई म्हणाले आहेत. उबाठाच्या बैठकीत काय झालं याच्याशी काही घेणंदेणं नाही. त्यांचा स्वभाव म्हणजे 'झालं काम करा लांब' ही भूमिका आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे.
उबाठाच्या बैठकीत काय झालं याच्याशी आमचं घेणं देणं नाही. त्यांनी आमच्या घरात डोकावू नये. त्याचा स्वभाव म्हणजे 'झालं काम करा लांब' ही भूमिका आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. उद्धव ठाकरेंनी त्याच वेळी अशा प्रकारे आमदार पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती. आम्ही युतीचा भगवा यावेळी पालिकेवर फडकवू अशी प्रतिक्रिया माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.