भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना
राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सध्या सुरू असलेले संसदेचे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहेत. अशात राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे.
दरम्यान काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एक्सवर नुकतीच एक पोस्ट केली आहे. यामध्ये सिब्बल यांनी सांगितेल आहे की, इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या मुख्य सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांच्या विरोधात विरोधकांनी मंगळवारी अविश्वास प्रस्ताव आणला आणि भारताच्या संसदीय इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई ठरली.
या अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) सुमारे ७० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात काँग्रेस, बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, तामिळनाडूचा द्रमुक आणि लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांचा समावेश आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहता हा प्रस्ताव नामंजूर होण्याची शक्यता आहे. मात्र विरोधकांना सभापती त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देत नाहीत, हे सिद्ध करायचे आहे.
आज दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू झाले तेव्हा सत्ताधाऱ्यांनी जॉर्ज सोरोस यांचा तर विरोधीपक्षांनी उद्योगपती गौतम अदाणी यांचा मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्द्यांवरूनच सत्ताधारी तसेच विरोधकांनी केलेल्या गोंधळानंतर आधी लोकसभेची तर नंतर राज्यसभेची कार्यवाही उद्या सकाळी ११ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित केल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत अदाणी यांच्याबाबतच्या मुद्द्यांवर सरकारकडून उत्तराची मागणी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.