वाल्मिकी कराडची खाती गोठवली, बायकोचीही चौकशी
बीड : खरा पंचनामा
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणाचा तपास सीआयडीकडून केला जात आहे. त्यासोबतच बीडमधील हत्या प्रकरणाची चौकशी बीड पोलिसांकडूनही केली जात आहे. त्याच आता वाल्मिक कराड हा लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराड याची सर्व बँक खाती गोठावण्यात आली आहेत. तसेच पत्नीचीही कसून चौकशी सुरु आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) 9 पथकं तयार केली आहेत. यात १५० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच समावेश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, वाल्मिक कराड याचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. फक्त वाल्मिक कराड नव्हे तर त्याच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
तसेच वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात येत आहे. तब्बल दोन तास ही चौकशी सुरु होती. तसेच स्कॉर्पिओ गाडीत सापडलेले मोबाईल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व कॉल, व्हाट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम सीआयडीकडून सुरु आहे. स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या दोन मोबाईलमध्ये काही महत्त्वाचा डेटा आणि व्हिडीओ मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे. फरार आरोपींच्या संपर्कातील लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी पक्षाचे काम करत आहे. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळीमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात ते अग्रेसर असतात. परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. 307 सारख्या गुन्हांमध्ये सहभागी असल्याचा वाल्मिक कराड यांच्यावर आरोप आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.