Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ही काय भानगड, चक्क पुरुष शिक्षक प्रेग्नंट!

ही काय भानगड, चक्क पुरुष शिक्षक प्रेग्नंट!



पाटणा : खरा पंचनामा

बिहारचं शिक्षण विभाग कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायम चर्चेत असते. यावेळी मात्र इथल्या शाळेत भलतंच घडलं आहे. तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल इथल्या शाळेतील एक पुरुष शिक्षक चक्क प्रेग्नंट झाला आहे. आश्चर्य म्हणजे त्याला विभागाकडून मॅटर्निटी लिव्हही मिळाली आहे. आता हे कसं शक्य आहे, हे प्रकरण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

हाजीपूरमधील हसनपूर ओसती हायस्कूलमधील हे प्रकरण. बीपीएससी शिक्षक जितेंद्र कुमार सिंह यांना शिक्षण विभागाने प्रेग्नंट म्हणून सुट्टी दिली. शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जितेंद्र कुमार सिंह यांना मॅटर्निटी लिव्ह देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थानुसार जितेंद्र कुमार सिंह प्रेग्नंट आहेत आणि ते सुट्टीवर आहेत.

या प्रकरणी विभागातील शिक्षण अधिकारी अर्चना कुमारी यांनी विभागाची चूक झाल्याचं मान्य केलं, घाईघाईत हे झाल्याचं त्यांनी सांगतलं. पुरुष शिक्षकाला अशी सुट्टी दिली जात नाही. यात लवकरच सुधारणा करण्यात आली.

याआधी पाकिस्तानातही असाच प्रकार घडला होता. कोरोना काळात खानवेलमध्ये 60 वर्षांच्या वरील वुद्धांना कोरोना टेस्ट कायला सांगितलं. तेव्हा एक पुरुष गरोदर असल्याचं आढळलं. अल्ला बिट्टा असं या व्यक्तीचं नाव. त्याने खानवेलमधील लॅबने केलेल्या लघवीच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं अर्थातच आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. गर्भवती असल्याचे रिपोर्ट आलेल्या व्यक्तीचं नाव. अल्लाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यही चकित झाले. पण नंतर हा अहवाल खोटा असल्याचं समोर आलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.