सराईत गुंडाला राजकीय नेत्याच्या सांगण्यावरुन गुन्ह्यातून वगळणे पडले महागात
पीएसआय तडकाफडकी निलंबित
पिंपरी : खरा पंचनामा
काळेवाडी येथे दोन गटात झालेल्या खुनी हल्ल्यात राजकीय नेत्याच्या दबावातून सराईत गुन्हेगाराचे नाव एफआयआरमधून वगळण्यात आले. ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी संबंधित गुन्हेगाराला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करायला लावलेच त्याबरोबर राजकीय दबावाला बळी पडलेल्या पीएसआयला तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
काळेवाडी येथे २२ डिसेंबरच्या रात्री किरकोळ अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई मागितल्याने दोन गटात हाणामारी झाली होती. त्यात पोलिसांनी दोन्ही गटांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली होती. मात्र, त्याचवेळी त्यांनी प्रशांत दिघे या सराईत गुन्हेगाराचे नाव फिर्यादीतून वगळले. प्रशांत दिघे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यासारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याचे नाव पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी गुन्ह्यातून वगळले होते. ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजली.
तेव्हा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रशांत दिघे याचे नाव समाविष्ट करण्याचा आदेश देऊन तात्काळ अटक करण्यास सांगितले. प्रशांत दिघे याला अटक झाल्याने या राजकीय नेत्याचे पित्त खवळले. त्यामुळे त्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलीस पक्षपातीपणा करतात हप्ते वसुली करतात, असे जाहीरपणे आरोप केले. या राजकीय नेत्याच्या आरोपांना प्रसिद्ध मिळताच त्यामागील खरे कारण काय आहे, याची माहिती पोलिसांनी हस्ते परहस्ते सर्वांपर्यंत पोहचवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव झुगारल्यानेच हे आरोप होत असल्याचे लक्षात आल्यावर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. त्यातूनच मग महायुतीतील दुसऱ्या पक्षातील नेते पिंपरी चिंचवड पोलीस चांगले काम करीत असल्याचे सांगायला पुढे आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.