एसपी अविनाश बारगळ पुन्हा अडचणीत!
खासदार बजरंग बाप्पांचा हक्कभंग
बीड : खरा पंचनामा
राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. शुक्रवारी विधीमंडळात देखील हा मुद्दा चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता बदली झालेले पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ पुन्हा अडचणीत आले आहे
देवेंद्र फडणवीसांनी बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर अवघ्या 24 तासांत बीडला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून बारगळ यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मस्साजोग प्रकरणाता पहिल्या दिवशी फोन न उचलणे हे बारगळ यांच्या अंगलट आले असून राज्याच्या मुख्य सचिवांना कारवाईचे निर्देश दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांसह स्थानिक लोकांकडून केली जातेय. स्थानिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासात कुचराई केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर बारगळ यांची शुक्रवारी बदली करण्यात आली आणि आज कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आश्वासन दिले. तर या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा लावण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेनंतर घडामोडींना वेग आला आहे. विशेष सरकारी वकिल म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोल्हे वकिल म्हणून काम पाहणार आहे. तर केसच्या संपूर्ण तपासासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्जवल निकम यांची नेमणूक करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मागणी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.