महाराष्ट्रात प्रमुख राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यातच निवडणूकांमध्ये मिळालेल्या यश-अपयशामुळे राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्ष बदल्यांच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. विविध कारणांमुळे पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील वर्षी 12 जानेवारीला शिर्डी येथे पक्षाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चा आहे.
दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे. तसेच नागपूरमधील गटबाजी उफाळून आली असून अनेकांनी पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून लवकरच प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी विधानसभा निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा समर्थकांकडून दावा केला जाता आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टर्म आधीच पूर्ण झाली आहे. त्यातच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षफुटीमुळे अनेक ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. यामुळे शरद पवारांकडून युवा व नवीन चेहरा देणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर त्यांच्या नेतृत्त्वात पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं. त्यामुळे तटकरे यांना तुर्तास अभय मिळण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.