मिरज महाविद्यालयातील भावी डॉक्टर तरुणीचा मृत्यू
माडग्याळची तरुणी गंभीर जखमी, कुरुंदवाडजवळ अपघात
जयसिंगपूर : खरा पंचनामा
खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे देवदर्शन करून परतताना सैनिक टाकळी रस्त्यावर मोपेडचा अपघात होऊन एक महाविद्यालयीन युवती जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. याची कुरुंदवाड पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे.
इव्हेजनील बाळासाहेब जिरगे (वय 20, रा. लातूर) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे तर कविता श्रीशैल माळी (वय 24 ,रा. माडग्याळ ता. जत, जि. सांगली) असे जखमी तरुणीचे नाव आहे.
मिरज येथील गुलाबराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थिनी देव दर्शनासाठी खिद्रापूरला गेल्या होत्या. मृत इव्हेजनील जिरगे व कविता माळी या दोघी मोपेड (एम. एच.10 सी. जे. 7028) वरून मिरजेकडे निघाल्या होत्या. खिद्रापूर दरम्यानच्या सैनिक टाकळी रस्त्यावर आल्यानंतर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेच्या दगडाला जोराची धडक बसली. यात इव्हेजनील जिरगेच्या डोक्याला मार लागल्याने ती जागीच ठार झाली तर कविता माळी गंभीर जखमी झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.