Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही



नवी दिल्ली : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकणार्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात परवानगी मिळालेली नाही. 26 जानेवारी 2025 रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले. या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नसल्याचं समोर आलं आहे.

मात्र आतापर्यंत म्हणजे 1971 पासून ते 2023 पर्यंत महाराष्ट्राला 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. आतापर्यंत एकूण 7 वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक, तर 4 वेळेस दुसरे पारितोषिक आणि 2 वेळेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे. एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही (हॅटट्रिक) राज्याच्या नावावर जमा आहे. अशातच या वर्षी या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नसल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

सर्वप्रथम 1981 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. 1983 मध्ये बैलपोळा या चित्ररथासही प्रथम पारितोषिक मिळाले. यानंतर 1986 मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राचे योगदान या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरे पारितोषिक, तर 1988 मध्ये लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक खटला या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. यानंतर 1993 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे शताब्दी वर्ष या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर 1994 मध्ये हापूस आंबा या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले. 1995 मध्ये बापू स्मृती या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले आणि सलग तीन वर्षे चित्ररथास पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने पारितोषिकांवर आपली आघाडी सिध्द केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.