Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरवापसीनंतरही मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक झाडाखाली!

घरवापसीनंतरही मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक झाडाखाली!



मुंबई : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईबाहेर बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची घरवापसी झाली. मात्र अद्याप या अधिकाऱ्यांना छप्पर न मिळाल्यामुळे झाडाखाली दिवस काढावे लागत आहे. मुंबईतील अनेक पोलीस ठाणी रिकामी असूनही अद्याप पोस्टिंग न मिळाल्यामुळे या अधिकाऱ्यांना मुंबई पोलिस आयुक्तालयात दररोज हजेरी लावून पोस्टिंगसाठी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीबाहेर असलेल्या झाडाखाली थांबावे लागत आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईसह राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यात आलेल्या होत्या. एकट्या मुंबईतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक या पदावरील जवळपास १७० जणांची मुंबई जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली होती. त्यात जवळपास ७० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात कार्यकाळ बाकी असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा यामध्ये समावेश होता. या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदलीनंतर मुंबईतील अनेक पोलीस ठाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशिवाय रिकामी ठेवण्यात आली होती. या पोलीस ठाण्याचा कार्यभार संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांकडे सोपविण्यात आला होता.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर निकाल लागताच मुंबईतून बदली करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांना पुन्हा मुंबईत आणले गेले. या पोलिसांची घरवापसी झाल्यानंतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ मुंबई पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली.

जवळपास दोन आठवडे उलटल्यानंतर पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दररोज पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी दाखल होतात आणि पोलीस आयुक्तालयाच्या आवारात असलेल्या झाडाखाली (आता ते झाड त्या ठिकाणी नाही) पोस्टिंगची वाट पहात थांबत आहे. दरम्यान झाडाखाली पोस्टिंगची वाट पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी मंगळवारी पोलीस निरीक्षकांना पोस्टिंग देण्यात आलेले जवळपास ६८ वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे पोस्टिंगच्या प्रतीक्षेत अद्यापही झाडाखाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची त्या पोलिस ठाण्यात खुर्ची रिकामी असून तेच पोलीस ठाणे मिळावे म्हणून अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक झाडाला प्रार्थना करीत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.