Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक

शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली
मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस उलटले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. त्यातच महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानावर जोरदार तयारीला देखील सुरुवात झाली असून आता शपथविधी संदर्भात मंत्रालयात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडत आहे. बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित आहेत. तर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सत्यनारायण चौधरी देखील बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे.

आमदार प्रसाद लाड, भाजप नेते मोहित कंबोज हे सुजाता सौनिक यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. सुरक्षा व्यवस्था आणि शपथ ग्रहण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी दोन्ही नेते सुजाता सौनिक यांच्या भेटीला पोहचत आहेत. VVIP आणि VIP यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील ते चर्चा करणार आहेत. दरम्यान, शपथविधीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच महायुतीचे काही आमदार देखील मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.