सहाय्यक फौजदारानेच चोरल्या एसपी ऑफीसमधील बॅटऱ्या
बीड : खरा पंचनामा
अपहरण, खुन, खंडणी, हवेत गोळीबार आदी घटनांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आलेला असतानाच आता चक्क पोलिस अधीक्षक कार्यालयातून बॅटऱ्यांची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे चोरटा पोलिस दलातीलच सहाय्यक फौजदार आहे.
अमित मधुकर सुतार (रा. खोकरमोहा ता. शिरूरकासार) व माधव गोरक्षनाथ जामकर (रा. वडगाव गुंदा ता. बीड) अशी संशयितांची नावे आहेत. अमित सुतार सहाय्यक फौजदार असून तो पोलिस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत आहे. तर, माधव जामकर हा दुकानदार आहे.
दोघांनी संगणमताने चोरी केल्याची फीर्याद याच विभागातील पोलिस उपनिरीक्षक बाबुलाल यल्लप्पा जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. अमित सुतार व माधव जाधव या दोघांना पोलिसांनी अटकही केली. नोव्हेंबर महिन्यात अमित सुतार यांनी तीन बॅटऱ्या चोरी केल्या होत्या.
तर, ता. २५ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्यापूर्वी आणखी सात बॅटऱ्यांची चोरी केली. अमित सुतार सुतार व माधव जामकर यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. राठोड करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.