'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकाच्या बाजूने २६९ मते
नवी दिल्ली : खरा पंचनामा
'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक आज मंगळवारी (दि.१७) लोकसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडल्यानंतर ते चर्चेसाठी लोकसभेत स्वीकारण्यात आले.
या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध झाला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विधेयकावर चर्चा व्हावी की नको, यावर पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मतदान घेतले. त्यावर विधेयकाच्या बाजूने २६९ मतदान झाले. तर विरोधात १९८ मते पडली. या विधेयकाला संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ असे नाव देण्यात आले आहे. विशेषतः काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला. यानंतर लोकसभेचे कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.