राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री मनपा आयुक्तपदी
नाशिक : खरा पंचनामा
राहुल कर्डिले यांच्या रूपाने तब्बल सहा वर्षांनंतर नाशिक महापालिकेला थेट आयएएस अधिकारी आयुक्तपदी लाभल्यामुळे नाशिककर आनंदात असताना कर्डिले यांच्या नियुक्तीला काही तासांतच ब्रेक लागला.
राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असून नाशिक महानगरविकास प्राधिकरणाच्या सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांची नाशिकच्या मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्याचे कारण म्हणजे प्रामुख्याने मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.