Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

परीक्षा मंडळाचा 'हा' निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट मिळणार

परीक्षा मंडळाचा 'हा' निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट मिळणार



मुंबई : खरा पंचनामा 

इयत्ता दहावी आणि इयत्ता बारीवीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर अशा प्रकारचे जात प्रवर्गाचा उल्लेख कशामुळे करण्यात आला? त्यामागचा उद्देश काय आहे? असे विचारण्यात येत होते. या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे. आता इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी नोव्याने प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहेत.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यामागे नेमका काय हेतू आहे, असा प्रश्न विचारण्यात येत होता. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी जातीच्या प्रवर्गाचा उपयोग काय? असाही सवाल करण्यात येत होता. त्यावर शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद नेमकी काय झाली आहे,

पालक तसेच विद्यार्थ्यांना समजावे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्या येत होते. मात्र शिक्षण मंडळाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध झाल्यानंतर शेवटी शिक्षण मंडळाने दिलगीरी व्यक्त करून हा निर्णय मागे घेतला आहे.

या विरोधानंतर शिक्षण मंडळाने हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तसेच नव्याने हॉल तिकीट जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

आता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना 23 जानेवारी 2025 पासून हे नवे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना 20 जानेवारी 2024 रोजीच्या दुपारी तीव वाजेपासून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळाचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की,

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुकवार दिनांक 10/01/2025 रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

या संदर्भात कळविण्यात येते की, 1) मंडळाने उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर जातीचा प्रवर्ग या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रांवरील सदरचा जातीचा प्रवर्ग कॉलम रद्द करण्यात येत असून विद्याथ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.