एसआयटीचे हे 10 जण लावणार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा छडा
बीड : खरा पंचनामा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी राज्य सरकारने या प्रकरणात विशेष एसआयटीची स्थापना केली आहे.
संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी बुधवारी पाण्यात उतरून आंदोलन केलं. या प्रकरणात अद्यापही मुख्य आरोपी फरार आहे. त्यातील सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच लपून बसल्याची माहिती आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली नऊ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या टीममध्ये बीड सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीडचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.