राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा
मुंबई : खरा पंचनामा
महायुती सरकारला दिलासा देणारी एक मोठी बातमी सध्याच्या घडीला समोर येतेय. राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत नियुक्तीच्या शिफारशीची यादी शिंदे सरकारने मागे घेतली होती. याविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे कोल्हापूरचे नेते सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयाचे धाव घेतली होती. परंतु, ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीमध्ये या मुद्द्यावरून वाद रंगला होता. मात्र आता या निर्णयामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.