Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जोरदार झटका

13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जोरदार झटका



बीड : खरा पंचनामा 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या महिन्याभरात अनेक गुन्हे, गुंडागिरी, दादागिरी, घोटाळे अशी प्रकरणे राज्यभर गाजत आहे. बीडची गुन्हेगारी समोर येत आत असताना आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठी कारवाई केली आहे.

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 13 सरपंच आणि 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जोरदार झटका असून जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्व रद्द केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडून आलेल्या व्यक्तीस निवडून आलेल्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. मात्र, 2020 पासून झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर या तालुक्यांतील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंच सदस्यांची पदे रद्द केली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.