Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

25 वर्षात 15 गुन्ह्यांची नोंद

25 वर्षात 15 गुन्ह्यांची नोंद



बीड : खरा पंचनामा 

राज्यभर गाजत असलेल्या बीडच्या खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याने मंगळवारी सीआयडीसमोर शरणागती पत्करली.

त्यानंतर केजमधील कोर्टाने कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत चौकशी सुरू आहे. तर, दुसरीकडे त्याचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहितीसमोर आली आहे. वाल्मिक कराड विरोधात मागील 25 वर्षात 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात आले. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेत्यांसोबत असलेल्या जवळीकीने कराड चर्चेत आला. बीडचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराडचे अनेक कारनाम्यांची चर्चा सुरू झाली.

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर वर्ष 1999 ते 2024 या मागील 25 वर्षात परळी शहर पोलीस ठाण्यासह, बर्दापूर पोलीस ठाणे, अंबाजोगाई शहर आणि केज पोलीस ठाणे अशा एकूण चार पोलीस ठाण्यात एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. त्यात एकट्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी व मारामारीचे 4 गुन्हे, खुनाचा प्रयत्न 1 गुन्हा, रस्त्यात अडवल्याचे 3 गुन्हे तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2 गुन्हे असे एकूण 10 गुन्हे दाखल झालेले आहेत.

वाल्मिक कराडवर कोणते गुन्हे दाखल ?
- बर्दापूर पोलीस ठाण्यात 2019 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
- खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे वाल्मिक कराड याच्यावर आहेत. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात 2024 मध्ये 1 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर 2006 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
- खुनाचा प्रयत्न करणे यात गोळीबार मारहाण प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात 4 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
- 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध केज पोलिसांत बुधवार 11 डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.