30 माजी मंत्री अन् खासदारांची सुरक्षा काढली जाणार
गृहमंत्रालयास पाठवलेल्या अहवालात कोणाची नावे ?
दिल्ली : खरा पंचनामा
कें द्र सरकारकडून मंत्री आणि खासदारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा वेळोवेळी घेतला जातो. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसंदर्भातील अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आता गृहमंत्रालयास पाठवण्यात येणार आहे. त्यात १८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांना कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची सुरक्षा काढण्याची शिफारस दिली आहे. दिल्ली पोलीस गृहमंत्रालयास या लोकांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्याचे सांगणार आहे.
केंद्र सरकारचे राज्यमंत्री आणि खासदारांना सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. सुरक्षा व्यवस्थेचा ताळेबंद काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर अनेकांची सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्यात आली. काही जणांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रदीर्घ काळापासून समीक्षा झालेली नाही. सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा / पुनर्विचार न करण्याची काही विशेष कारणे असू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा विभागाकडून काही महिन्यांपूर्वी नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्यात आले. त्यात अनेक जणांना सुरक्षा पुरवल्याचे दिसून येत आहे. त्याचा आढावा दीर्घकाळापासून घेतला गेला नाही. अनेक माजी राज्य मंत्री, माजी खासदार यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांना सुरक्षा दिली आहे.
ऑडिट रिपोर्टमध्ये ज्यांची नावे आहे, त्यात Y-श्रेणीची सुरक्षा मिळालेले माजी राज्य मंत्री भागवत किशनराव कराड, देवुसिंह चौहान, भानु प्रताप सिंह वर्मा, जसवंतसिंह भाभोर, जॉन बारला, कौशल किशोर, कृष्णा राज, मनीष तिवारी, पीपी चौधरी, राजकुमार रंजन सिंह, रामेश्वर तेली, एसएस अहलूवालिया, संजीव कुमार बालियान, सोम प्रकाश, सुदर्शन भगत, व्ही. मुरलीधरन, माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के सिंह आणि विजय गोयल यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.