सुरेश धस, धनंजय मुंडेंसह 'या' 35 नेत्यांची आमदारकी धोक्यात!
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन महिने उलटले आहेत. तरी देखील या निवडणुकीच्या निकालाबाबत विरोधकांकडून एव्हीएमचा मुद्दा उकरून काढला जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तरीही निवडणूक प्रक्रियेवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.
अशातच आता विजयी झालेल्या जवळपास 35 आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक निकालाच्या विरोधात याचिका दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या आमदारांच्या विरोधात मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तरीही या याचिका निकाली निघेपर्यंत निकालाची चर्चा आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याचं दिसत आहे. एकीकडे विजयी उमेदवारांच्या आमदारकीवर टांगती तलवार असतानाच तिकडे महाविकास आघाडीतील 12 पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कोणत्या आमदारांविरोधात याचिका?
धनंजय मुंडे, सुरेश धस, संजय शिरसाठ, तानाजी सावंत, संजय बनसोडे, हिकमत उढाण, संतोष दानवे, अर्जुन खोतकर, आमदार रमेश कराड, राजू नवघरे, बाबासाहेब पाटील, अमोल पाटील, मंजुळा गावित, नमिता मुंदडा या आमदारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
तर महाविकास आघाडीमधील पराभूत उमेदवारांनी देखील निकाला विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर 11 जणांनी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखीव ठेवला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.