41 इंचाचा एक गॅसचा पाईप, 4 लोखंडी रॉड, 5 क्लच वायर आणि धारधार कत्ती
सरपंचांना मारण्यासाठीच्या शस्त्रांची यादी ऐकून कोर्ट सुन्न
बीड : खरा पंचनामा
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशुमखांची ज्याप्रकारे संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
कारण सरपंचांची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती, मयत सरपंच संतोष देशमुख यांचे लायटरने डोळे जाळले, संपूर्ण पाठ काळीनिळी झाली होती. शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्या होत्या. सध्या या प्रकरणातील चार आरोपी हे पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून या हत्या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हत्येच्या संदर्भातील शस्त्रांची माहिती दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपींना 18 जानेवारीपर्यंच पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदारला 12 दिवसांची सीआयडी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक करण्यात आली. कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडलाही अटक करण्यात आली.
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केले. तसेच न्यायालयाला संतोष देशमुखांच्या हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली याची देखील माहिती देण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती. लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र, चार लोखंडी रॉड आणि एक कोयता तसेत लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती देखील वापरली होती.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेले. तेथे 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला. परंतु पैसे संपल्याने दोघेही पुण्यात आले. एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले, संतोष आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले. तेथील एका मंदिरात थांबल्याचे एसआयटीच्या चौकशीत समोर आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.