नव्या वर्षात खुशखबर ! 6 महिन्यांनी स्वस्त झाला गॅस सिलिंडर
मुंबई : खरा पंचनामा
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गुडन्यूज मिळाली आहे. जवळपास 6 महिन्यांनंतर सिलिंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात 14.50 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरसाठी म्हणजेच 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
व्यावसायिक सिलिंडरबद्दल बोलायचे झाले तर राजधानी दिल्लीत किंमती कमी झाल्यानंतर आता 1804 रुपयांना मिळत आहे. आधी 1818.50 रुपयांना मिळत होता. तेल विपणन कंपन्यांनी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. 1 जानेवारी 2025 पासून एलपीजी सिलिंडर 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी केले आहेत.
घरगुती एलपीजी सिलेंडर म्हणजेच 14 किलो सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1 ऑगस्ट 2024 रोजी दर बदलले होते. त्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरचे दर आजपर्यंत स्थिर आहेत. आज 1 जानेवारी 2025 वर्षाचा पहिला दिवस. एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 1 जानेवारी 2025 पासून दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1804 रुपये, मुंबईत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये आणि कोलकातामध्ये 1911 रुपये असेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.