Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संतोष देशमुख हत्या प्रकरण ! सुनावणीपूर्वीच सरकारी वकिलाने सोडली केस

संतोष देशमुख हत्या प्रकरण ! सुनावणीपूर्वीच सरकारी वकिलाने सोडली केस



बीड : खरा पंचनामा 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी केज कोर्टातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. काल रात्री आरोपी वाल्मिक कराड यांच्या रिमांडबाबत केज कोर्टात रात्री उशिरा सुनावणी पार पडली. सीआयडीचं पथक रात्री साडे नऊच्या दरम्यान केजमध्ये दाखल झालं होत.

त्यानंतर त्यांची केजच्या शासकीय रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी झाली. तपासणीनंतर त्यांना घेऊन सीआयडी पथक केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्याठिकाणी काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर त्यांना केज कोर्टात आणल जाणार होतं. पण त्यापूर्वी केज कोर्टात काही नाट्यमय घडामोडी घडल्या.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वाल्मिक कराडची बाजू मांडण्यासाठी चक्क एक नाही तर दोन-दोन वकील दाखल झाले. सीआयडीची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे हे दाखल झाले. पण सुनावणीला अवघे काही क्षण सुरु असताना वैयक्तिक कारणास्तव सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी या प्रकरणी अन्य वकील नेमावा असं कोर्टाकडे पत्र दिलं. याप्रकरणी जे. बी. शिंदे सरकारी वकील म्हणून युक्तिवाद केला.

दरम्यान, सुनावणीवेळी जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराड यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.