परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवलं
बीड : खरा पंचनामा
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक बेकायदेशीर कृत्यांची चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात परळीतील वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप झाले. त्यानंतर परळीतील अनेक बेकायदेशीर कृत्य, व्यवसाय यांच्या अनेक सुरस कथांची चर्चा सुरू झाली आहे. विद्युत केंद्रातील राखेचीही चर्चा सुरू झाली आहे. अशातच परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे.
परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे. या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते. या राखेची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शनिवारी रात्री झालेल्या या अपघातानंतर स्थानिक चांगलेच संतप्त झाले आहे. राखेच्या काळाबाजाराने स्थानिक त्रस्त आहेत. राखेची वाहतूक करणारे टिप्पर, ट्रक हे उघड्याने राखेची वाहतूक करतात. त्यामुळे राख उडते आणि लोकांच्या डोळ्यात जाते. त्याशिवाय, राखेमुळे इतर समस्या निर्माण झाल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.