निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणार पेन्शन
मुंबई : खरा पंचनामा
निवृत्त कर्मचार्याच्या निधनानंतर त्याच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील अविवाहित, अपत्य, घटस्फोटित, विधवा मुलगी, मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्तीवेतनाची रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषि विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचार्याचा पती किंवा पत्नीच्या मृत्युनंतर अविवाहित मुलीच्याबाबतीत ती 24 वर्षे वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्यात येते. मानसिक अथवा शारिरीक विकलांगता असलेल्या पाल्याला हयातभर कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्याची तरतूद आहे. आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचार्याच्या व त्याच्या प्रथम वारस (पती / पत्नी) यांच्या मृत्युनतर कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्याबाबत निवृत्तिवेतनाबाबत सुधारणा केली आहे. केंद्र शासनाने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.