नशेची इंजेक्शन्स, गोळया पुरवणारा वितरक रडारवर
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती; नशा करणाऱ्यांकडेही होणार चौकशी
सांगली : खरा पंचनामा
वैद्यकीय इंजेक्शनचा नशेसाठी वापरण्यात येणारा साठा नुकताच जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य वितरक आता पोलिसांच्या रडारवर असून, त्याचा शोध घेतला जात आहे. नशा करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या प्रकरणातील वीस जणांची यादी समोर आली आहे. लवकरच धक्कादायक माहिती समोर येईल, असेही सांगण्यात आले. मेफेंटमाईन इंजेक्शन, गोळ्या साठा व विक्री करणाऱ्या तिघांकडे पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. शरीरसौष्ठवसाठी याचा वापर प्रामुख्याने केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. नशेखोरीविरोधात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गांजा, नशेच्या गोळ्यांसह मेफेड्रोनसारखे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.
वैद्यकीय वापरासाठी असलेल्या इंजेक्शनचा वापर बेकायदेशीररीत्या नशा करण्यासाठी होत असल्याची माहिती महात्मा गांधी पोलिसांना मिळाली. त्यानुसार नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री करण्यासाठी आलेल्या रोहित कागवाडे, ओंकार मुळे यांना ताब्यात घेतले. दोघा संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. औषध विक्रेता आशपाक पटवेगारकडून इंजेक्शन घेतल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. या प्रकरणात प्रमुख वितरक पोलिसांच्या रडारवर आहेत. त्याला लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.