Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, चार जणांचा मृत्यू

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, चार जणांचा मृत्यू



तिरुपती : खरा पंचनामा 

आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर तिरुपती येथील रुया रुग्णालयात उपचार सुरु आहे. माहितीनुसार, दर्शनाचे टोकन घेण्यासाठी हजारो भाविक वैकुंठ गेटवर रांगेत उभे होते मात्र अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर अनेक जण या अपघातात जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातावर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे.

माहितीनुसार, तिरुपतीमध्ये वैकुंठ द्वार 10 दिवसांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी मंदिरात टोकन घेण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. टोकन वितरीत करण्यासाठी अनेक काउंटर तयार करण्यात आले होते मात्र हजारोंच्या गर्दीसमोर हे काउंटर कमी पडले. अपघाताची माहिती मिळताच तिरुपती पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुमारे 4 हजार लोक टोकन लाइनमध्ये उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघातावर शोक व्यक्त करत अपघाताबाबत अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यलयातून देण्यात आली आहे.

माहितीनुसार, वैकुंठाचे दरवाजे 10 दिवस उघडले जातात आणि यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. गेल्या वर्षी तब्बल 7 लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. दरवर्षी 10 ते 19 जानेवारी दरम्यान वैकुंठ एकादशीचे आयोजन केले जाते. एक दिवस आधी, तिरुमला तिरुपती देवस्थानम कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.