सीजीएसटीचे चार लाचखोर अधिकारी, कर्मचारी निलंबित
नागपूर : खरा पंचनामा
एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाकडून लाच स्वरूपात पैसे घेतल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर सीजीएसटी नागपूर आयुक्तालयातील दोन अधीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
अधीक्षक विजय सुंदर आणि आयुष अग्रवाल, निरीक्षक पवन सुतार आणि पुष्पेन्द्रमणि त्रिपाठी अशी या निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी कारवाई करण्याची धमकी देत कार्यालयीन परवानगी न घेता व्यावसायिकाच्या प्रतिष्ठानाला भेट दिली आणि लाच मागितली. अधिकार क्षेत्र नसताना कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक भेट घेतल्याने त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सीसीएसटी गुप्तचर पथकाने चौकशी सुरू केली आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर सीसीटीव्ही फुटेजनुसार लाच या कर्मचाऱ्यांनीच घेतल्याचे उघड झाले. चौकशी दरम्यान कर्मचाऱ्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने प्रधान अधीक्षक अतुल रास्ते आणि आयुक्त अविनाश थेटे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. दरम्यान अधिकाऱ्यांनी सध्या विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे अधिक तपशील उघड करण्यास नकार दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.