चक्क पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातच आढळला ९०० ग्रॅम गांजा
नंदुरबार : खरा पंचनामा
धडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातच ९०० ग्रॅम गांजा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचारी शशिकांत वसईकर याला निलंबित करण्यात आले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर पथकाने तीन दिवसांपूर्वी वसईकर यांच्या घरावर छापा टाकला. तपासणीदरम्यान गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
संबंधित पोलिस कर्मचाऱ्याकडे गांजा आला कोठून आणि तो विक्रीसाठी होता का, याचा तपास जिल्हा पोलिस आणि धडगाव पोलिस करत आहेत. तसेच, इतर अंमली पदार्थ किंवा गुटख्याच्या साठ्याचाही तपास सुरू आहे.
पोलिस दलातील कर्मचाऱ्याकडूनच अशा प्रकारे अंमली पदार्थांचा साठा आढळल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. यामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धडगाव पोलिस ठाण्याने वसईकर याला पोलीस कोठडीत ठेवून पुढील चौकशी सुरू केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.