Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इंटरपोलच्या धर्तीवर आता भारतपोल! काय आहे नेमकी कन्सेप्ट

इंटरपोलच्या धर्तीवर आता भारतपोल!
काय आहे नेमकी कन्सेप्ट



दिल्ली : खरा पंचनामा 

भारतात गुन्हे करुन परदेशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांचे दिवस आता भरणार आहेत. अपराध करणारे आते देशात किंवा थेट परदेशात लपले तरी कायद्याच्या कचाट्यातून ते सुटू शकणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने आता इंटरपोलच्या धर्तीवर भारतपोलची निर्मीती करणार आहे.

भारतपोल या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस थेट इंटरपोलल यंत्रणेला जोडणार आहेत. या पोर्टलची चाचणी यशस्वी झाली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ७ जानेवारी रोजी या पोर्टलचे लोकार्पण करणार आहेत.

जगातील १९५ देशांच्या तपास यंत्रणांची इंटरपोल ही एक पोलीस संस्था आहे. गुन्हेगारांबद्दलची माहितीची देवाण - घेवाण करण्याचे काम ही संस्था करते. भारतातील सीबीआचे अधिकारी इंटरपोलमध्ये नेमले जातात. भारतामध्ये गुन्हेगारीची एखादी घटना घडली आणि गुन्हेगार परदेशात पळून गेला असेल तर सीबीआयच्या विनंतीवरुन इंटरपोल त्या गुन्हेगाराची माहिती देते. ही माहिती सीबीआयकडे येते आणि त्यानंतर सीबीआय ही माहिती स्थानिक पोलिसांना देते. या संपूर्ण प्रक्रियेत खूप वेळ जात होता.

इंटरपोलकडून माहिती घेतल्यावर सीबीआय ती माहिती स्थानिक प्रशासनाला किंवा पोलिसाला देत होते. या प्रक्रियेत वेळ जात होता. आता भारतपोलच्या माध्यमातून राज्य पोलीस यंत्रणा थेट इंटरपोलशी संवाद साधू शकणार आहे. भारतपोलकडे अद्याप तरी, नोटीस बजावण्याचा अधिकार नसून तो अधिकार फक्त इंटरपोलकडे आहे. यासाठी इंटरपोलने भारतपोलची विनंती मान्य केल्यास देश सोडून गेलेल्या गुन्हेगाराविरूद्ध नोटीस बजावली जाऊ शकते. तसेच परदेशात पळालेल्या गुन्हेगाराची माहिती आता थेट स्थानिक पोलिसांना मिळू शकते.

राज्य पोलीस एखाद्या गुन्हेगारासाठी थेट इंटरपोलकडे विनंती पाठवू शकणार आहे. इंटरपोल त्यांना सरळ त्याची माहिती देणार आहे. यापूर्वी सीबीआयमार्फत इंटरपोलकडे विनंती पाठवावी लागत होती. त्यानंतर इंटरपोलने दिलेली माहिती सीबीआय राज्य पोलिसांना देत होती. त्यात वेळ जात होता. परंतु आता राज्य पोलिसांना देत होती. त्यात वेळ जात होता. परंतु आता राज्य पोलीस आणि इंटरपोल असा थेट संपर्क होणार असल्यामुळे तपास गतिमान होणार आहे.

केंद्रीय अन्वेषन ब्युरोने (सीबीआय) भारतपोल नावाचे अत्याधुनिक ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. जे राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस व एनआयए आणि ईडी या सर्व तपास यंत्रणांना जोडलेले असणार आहे. भारतपोलची यशस्वी चाचणी झाला असून येत्या ७ जानेवारीला भारत मंडपम येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या पोर्टलचे लोकार्पण करतील.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.