वैद्यकीय वापरासाठीचे इंजेक्शन्स, गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करण्याचा अहवाल पाठणार
महात्मा गांधी चौक पोलिसांना बक्षीस देणार : पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
वैद्यकीय वापरासाठी असलेले इंजेक्शन्स, गोळ्या यांची नशेसाठी विक्री, साठा करणाऱ्या औषध दुकानदारांचा परवाना रद्द करण्याचा अहवाल पोलिसांकडून पाठवण्यात येईल. वैद्यकीय इंजेक्शन्स, गोळ्यांचा सर्वात मोठा साठा पकडून रॅकेट उध्वस्त करणाऱ्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह त्यांच्या टीमला बक्षीस देऊ अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. घुगे म्हणाले, महात्मा गांधी चौक पोलिसांनी आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. यापूर्वीही पोलिसांनी याप्रकारच्या कारवाई केल्या आहेत. वारंवार अशा कारवाया करूनही अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित औषध दुकानाचा परवाना रद्द का केला जात नाही या प्रश्नावर घुगे म्हणाले, आता केलेल्या कारवाईत एका औषध दुकानदाराचा थेट संबंध उघड झाला आहे. त्याच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याचा अहवाल संबंधित विभाग तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. औषधी इंजेक्शन्स, गोळ्या यांचा नशेसाठी वापर होत असल्यास तसेच त्याची विक्री, साठा करणाऱ्यांची माहिती नागरिकांना पोलिसांना द्यावी. त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
इंजेक्शन्स, गोळ्यांचा नशेसाठी साठा, विक्री करणाऱ्या तिघांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडे कसून करून यामध्ये आंतरजिल्हा, आतंरराज्य रॅकेट असल्यास त्या रॅकेटची पाळेमुळे खणून काढू शिवाय औषध दुकानदारांना बेकायदेशीररित्या अशी इंजेक्शन्स, गोळ्या मोठ्या प्रमाणात देणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा अधीक्षक घुगे यांनी दिला आहे. पकडण्यात आलेली मेफेंटाईन इंजेक्शन्सची किंमत ३५० रूपये आहे मात्र तीनही संशयित ती इंजेक्शन्स नशेखोरांना आठशे रूपयांना विकत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. यामध्ये त्यांचे आणखी काही साथीदार असल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल असेही घुगे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.