उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा
देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया देण्यात आल्या होता. त्यातच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही 50 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे, महाविकास आघाडीत बिघाडी झाली का, महाविकास आघाडी पुढे टिकणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यातच, सत्ताधारी पक्षांकडून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मेळाव्यांचंही आयोजन केलं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीत साधारणपणे दीड तास चर्चा झाली. शिवसेना खासदार संजय राऊत व आमदार आदित्य ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक आटोपून उद्धव ठाकरे मातोश्रीकडे निघाले. या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच, 25 जानेवारी रोजी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये दोषींला कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जन आक्रोश मोर्चा संदर्भात महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.