Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाल्मिक कराडने गडचिरोलीतून बदली करुन आणलेला कर्मचारी एसआयटीत; खुनातील घुलेही त्याच्या जवळचा

वाल्मिक कराडने गडचिरोलीतून बदली करुन आणलेला कर्मचारी एसआयटीत; खुनातील घुलेही त्याच्या जवळचा



बीड : खरा पंचनामा 

संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष पथकातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल देशमुख कुटूंबियांना शंका आहे. त्यामुळे या मंडळींना तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे केली आहे. वाल्मिक कराडने गडचिरोली येथून बदली करुन आणलेला एक पोलिस कर्मचारीही यात आहे.

काही लोक त्याच्या अतिसंपर्कात आहेत. तत्कालीन पालकमंत्र्यांनी आपले पद भाड्याने दिल्याने त्यांच्या शिफारसीने काही कर्मचारी आलेले आहेत. अशा कर्मचाऱ्यांनी त्यांची स्वामीनिष्टा दाखवू नये, यासाठी ही मागणी केल्याचे सुरेश धस म्हणाले.

श्री. धस यांनी शुरकवारी (ता. तीन) विविध मुद्द्यांवर संवाद साधला. सरपंच संतोष देशमुख खूनातील आरोपी सुदर्शन घुले हा कराडच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे. आपल्या 'आका'ला (वाल्मिक कराड) 'आम्ही किती खतरनाक आहोत' हे दाखविण्यासाठी त्यांनी इतक्या निर्घणपणे हत्या केली असावी.

परंतु आता सीडीआरमधून सगळं बाहेर येणार आहे. त्यामुळे 'आका' (कराड) वाचनं अशक्य आहे. करुणा मुंडे यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारी व्यक्ती देखील पोलिस दलातीलच होती. त्याने कोणाच्या सांगण्यावरून ते काम केल, त्याच नाव देखील मला माहिती असून ते आपण पोलिस अधीक्षकांना सांगणार आहोत.

मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याच प्रकाश सोळंकेंची आहे. नैतिकतेच्या आधारावर सोळंकेंच्या मागणीला आपला पाठींबा आहे. या प्रकरणात त्यांचा संबंध आहे असे आपण म्हणणार आहे. या प्रकरणात त्यांचा संबंध आहे असे आपण म्हणणार नाही. पण देशमुख खून प्रकरणाची चार्जशिट दाखल होईपर्यंत त्यांनी बिनाखात्याचे मंत्री राहावे.

परळीत औष्णीक विज केंद्राच्या राखेचं भयान वास्तव आहे. सिरसाळा येथे ३०० अवैध विटभट्टी आहेत. ज्याने राख उचलण्याचे कंत्राट घेतले आहे त्याचे वाहन सुद्धा तिथे उभा करू देत नाहीत. याबाबत आपण पत्र दिले आहे. प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई नाही केली तर ते प्रदूषण रोखण्यास अयशस्वी ठरले यबाबत कारवाईची मागणी करणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.