Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संतोष देशमुख प्रकरणावरून गोंधळ सुरूच ; जालन्यात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

संतोष देशमुख प्रकरणावरून गोंधळ सुरूच ; जालन्यात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे



जालना : खरा पंचनामा 

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच या प्रकरणी आज मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. आज जालना याठिकाणी झालेल्या या निदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा शाखेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या अजित पवारांसमोर मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख हे या निदर्शनाचे नेतृत्व करत आहेत. निदर्शनादरम्यान, कार्यकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दलित व्यक्ती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीत झालेल्या हत्येविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, महायुती सरकारने नुकतीच राज्यातील जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये अजित पवार यांची बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे. अरविंद देशमुख म्हणाले की, पालकमंत्री म्हणून परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी अजित पवार यांची आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.