नितेश राणे यांचा सांगलीत इशारा, कोल्हापूर प्रशासनाचा विशाळगडावरील उरुसासंदर्भात मोठा निर्णय
कोल्हापूर : खरा पंचनामा
मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन विशाळगडावर होणाऱ्या उरुसासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. हिंदुत्ववादी नेते, मंत्री नितेश राणे यांनी विशाळगडावर उरुस होऊ देणार नाही, असा इशारा सांगलीत दिल्यानंतर शेजारीच असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ऊरुसाला परवानगी नाकारली आहे.
विशाळगडावर रविवारी उरूस होणार होता, त्या ऊरुसाला कोणत्याही पद्धतीची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही.
विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये, या पार्श्वभूमीवर सावधनतेचे पाऊल म्हणून प्रशासनाने उरूसाची परवानगी नाकारल्याचे कळते आहे.
- हजरत पीर मलिर रेहान मीरासाहेब बाबांच्या नावाने दरवर्षी उत्सव भरतो
- १८८६ मध्ये ब्रिटिशांच्या गॅझेटमध्ये विशाळगडावरच्या दर्ज्याचा उल्लेख
दर्गा १७ फूट लांब, १५ फूट रुंद आणि ८ फूट उंच असा उल्लेख
दर्याच्या रेखरेखीसाठी ब्रिटीशांकडून ९ पौंड अर्थात ९० रुपये मिळायचे
- उरूसात मुस्लीम आणि हिंदू भाविकही भक्तिभावाने सहभागी व्हायचे
- शेकडो वर्षांपासून उरूस भरतो, असा अनेकांचा दावा
- दरवर्षी दोन वेळा उरूस भरतो, हा उरूस तीन दिवस चालतो
एरवी प्रथा परंपरेप्रमाणे विशाळगडावर प्रत्येक वर्षे उरूस साजरा होत असे. या उरूसात हिंदू मुस्लीम बांधव श्रद्धेने सहभागी होत असत. मात्र मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विशाळगडावर दंगल उसळली. यात गडावरील स्थानिक लोकांचे मोठे नुकसान झाले.
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री, जहाल हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांनी सांगलीत हिंदू मोर्चात बोलताना विशाळगडावर उरूस कसा साजरा होतो तेच पाहतो, असा इशारा दिलेला होता. अन्य धर्मियांनी हिंदू समाजाच्या भावना भडकतील, असे कोणतेही कृत्य करू नये. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये. शासन म्हणून आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत, असे नितेश राणे म्हणाले होते.
दंगलीनंतर तब्बल पाच महिन्यांनंतर किल्ले विशाळगड पर्यटक, दुर्गप्रेमींसाठी खुला करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही अटी घातल्या असून, गडावर मांसाहार करण्यास सायंकाळी पाचनंतर थांबण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.