पालकमंत्री याच आठवड्यात जाहीर होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली तारीख
नागपूर : खरा पंचनामा
महायुती सरकारची स्थापना आणि मंत्रिमंडळाचा विस्ताराला सुमारे एक महिना उलटून गेला असला, तरी अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच आणि आपसात स्पर्धा सुरू आहे. याच कारणामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केला आहे. याच आठवड्यात पालकमंत्री जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "येत्या 15 ते 16 जानेवारीपर्यंत पालकमंत्रीपदाचा विषय सुटलेला असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आमच्या आतापर्यंत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. कोणाला कुठल्या जिल्ह्यात नियुक्त करायचे याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे". त्यामुळे 26 जानेवारीला झेंडा वंदन कोणी करायचे हा प्रश्न सुटलेला असले, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल, त्यावेळी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरू. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसोबत जाऊन काम करू. भाजप नंबर एकच पक्ष आहे. असे असले, तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीत पुढे जाऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.