Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्र्यांसाठी अधिकाऱ्यांच्या दालनांवर संक्रांत, दोन राज्यमंत्र्यांची मंत्रालयात व्यवस्था

मंत्र्यांसाठी अधिकाऱ्यांच्या दालनांवर संक्रांत, दोन राज्यमंत्र्यांची मंत्रालयात व्यवस्था



मुंबई : खरा पंचनामा 

महायुती सरकारमधील पाच मंत्र्यांना मंत्रालयात प्रशस्त दालन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे अधिकाऱ्यांच्या दालनांवर संक्रांत आली आहे. या निर्णयामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीवर मंत्रालयातून विस्थापित होण्याची वेळ आली आहे. याशिवाय, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनाही मंत्रालय पोटमाळ्यावरील आपले दालन सोडावे लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त एकूण 33 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री आहेत. गेल्या अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळाचा आकार वाढल्याने मंत्र्यांच्या दालनांसाठी मंत्रालयात पुरेशी जागा उपलब्ध नाही. जी जागा उपलब्ध आहे, ती पुरेशी नसल्याने मंत्र्यांनी आता दालनाची जागा वाढवून देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करताना सामान्य प्रशासन विभागाला मंत्रालयात स्वतःच्या विभागासाठी असलेल्या जागेवर पाणी सोडावे लागले आहे.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना मंत्रालय मुख्य इमारतीत अनुक्रमे पोटमाळा क्रमांक 1 आणि पोटमाळा क्रमांक 2 येथे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या दोन्ही मंत्र्यांना आता जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सीमा व्यास यांचे दालन पोटमाळ्यावरून मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर हलविण्यात आले आहे. सीमा व्यास यांच्यासाठी चौथ्या मजल्यावरील प्रतीक्षा कक्षात तातडीने दालन तयार करावे, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.