मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागालाच ध्वजारोहण आणि ध्वजवंदनातील फरक कळेना, चुकीचा आदेश व्हायरल
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजावंदनचा अर्थ कळत नाही का? हे विचारण्याची वेळ आता आली आहे. त्यामागील कारण म्हणजे 26 जानेवारीला पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं, असा शासन निर्णय मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आला आहे.
मुळात 15 ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं, तर 26 जानेवारीला ध्वजावंदन केल जातं. मात्र मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयात 26 जानेवारीला ध्वजावंदन ऐवजी ध्वजारोहण करावं असं स्पष्टपणे उल्लेख केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
स्वातंत्र्यदिनाला (15 ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेत मग फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जातं. तर प्रजासत्ताकदिनाला (26 जानेवारी) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते. मात्र राजशिष्टाचार अधिकारी यांना याचा विसर पडला आहे की काय? असा प्रश्न या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता ही चूक लक्ष्यात घेत यात बदल करून नवीन शासन निर्णय जाहीर केला जातो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.