सांगली जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या प्रभारींची बदली
निरीक्षक बिजली संजयनगरचे, सिद मिरज ग्रामीणचे, एपीआय संदीप शिंदे महात्मा गांधीचे प्रभारी
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या प्रभारींचे खांदेपालट करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी शुक्रवारी रात्री बदलीचे हे आदेश काढले आहेत. जतचे निरीक्षक सूरज बिजली यांची पुन्हा संजयनगरच्या प्रभारीपदी तर अजित सिद यांची मिरज ग्रामीणच्या तर एपीआय संदीप शिंदे यांची मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे कंसात कोठून कोठे - संदीप कोळेकर (नियंत्रण कक्ष ते जत), बयाजीराव कुरळे (संजयनगर ते नियंत्रण कक्ष), भैरू तळेकर (मिरज ग्रामीण ते जिल्हा विशेष शाखा), प्रदीप सूर्यवंशी (नियंत्रण कक्ष ते वाचक १), प्रविणकुमार कांबळे (विश्रामबाग ते नियंत्रण कक्ष), सुधीर भालेराव (नियंत्रण कक्ष ते विश्रामबाग), सहायक निरीक्षक जयदीप कळेकर (महात्मा गांधी चौक ते एलसीबी), मेघा पाटील (नियंत्रण कक्ष ते महिला कक्ष).
बदलीने पदस्थापना झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांचा कार्यभार स्विकारण्याचे आदेशही अधीक्षक घुगे यांनी दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.