Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदाराच्या अंगरक्षकानेच वेटरवर ताणली रिव्हॉल्व्हर; गुन्हा दाखल

आमदाराच्या अंगरक्षकानेच वेटरवर ताणली रिव्हॉल्व्हर; गुन्हा दाखल



नाशिक : खरा पंचनामा 

नाशिक रोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना नाशिक ग्रामीणच्या पोलिस अंमलदारानेच शासकीय रिव्हॉल्व्हर हॉटेलच्या वेटरवर ताणली आणि धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित पोलिस अंमलदार हा जिल्ह्यातील एका आमदाराचा अंगरक्षक असल्याचेही समोर आले आहे. विशाल झगडे (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे.

सागर निंबा पाटील (रा. आगरटाकळी रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड येथील हॉटेल रामकृष्णमध्ये ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी (ता. १०) रात्री साडेबाराच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलिस विशाल झगडे हा हॉटेलमध्ये दोन साथीदारांसह जेवण करण्यासाठी आला होता. त्याने हॉटेलमधील वेटर सिरॉन शेख यास बोलाविले. त्या वेळी बोलताना संशयित झगडे याने वेटरला शिवीगाळ केली.

त्यावरून वेटर बोलला असता, संशयित झगडे याने त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर ताणली आणि त्यास शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकारामुळे वेटरसह हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली. संशयित पोलिस झगडे याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्यासह शस्त्र दाखवून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.