हॉटेल फोडून साहित्य लंपास करणाऱ्या तिघांना अटक
३.६ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील एक हॉटेल फोडून त्यातील साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरलेले साहित्य, रोकड, टेम्पो असा ३.६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
समशुद्दीन महमद इलियास खान (वय २७, रा. पेठवडगाव, मूळ रा. मानखुर्द, मुंबई), महमद इम्रान अकबर अली (वय २४, रा. पेठवडगाव, मूळ रा. इटावा, उत्तरप्रदेश), फर्याद आलम महमद इलियास खान (वय २३, रा. इटावा, उत्तरप्रदेश) अशी अटक केलल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील गुन्ह्यात पाहिजे असलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकाला कुपवाड परिसरात एकजण मुंबई पासिंगचा टेम्पो घेऊन त्यातून भांडी, पत्रे विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. पथकाने तेथे जाऊन समशुद्दीन खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील टेम्पो आणि त्यातील साहित्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने कसबे डिग्रज येथील एक हॉटेल फोडून त्यातून साथीदारांच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली.
एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, महादेव नागणे, सागर लवटे, अमर नरळे, संदीप गुरव, संदीप नलवडे, विक्रम खोत, मेघराज रूपनर, अभिजित पाटील, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.